अशा या मंगलमय दिवाळीचं संगीतमय स्वागत करण्यासाठी ‘संगीत दीपोत्सव’ हा कार्यक्रम दिनांक ०४/११/२०२३ या दिवशी संध्याकाळी व्यास संगीत विद्यालयाच्या दादर येथील वास्तूत विद्यार्थी, शिक्षक आणि श्रोते यांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात पार पडला. श्री. कुलकर्णी सरांच्या हस्ते प्रतिकात्मक दीपप्रज्वलन झाल्यावर कार्यक्रमाची औपचारिक सुरवात झाली. तबला पेटीच्या सहाय्याने श्रोत्यांसमोर गायची अमूल्य संधी मिळत असल्याने अशा कार्यक्रमांना विद्यार्थ्यांचा
व्यास संगीत विद्यालय, दादर येथे शनिवार दिनांक २६/०८/२०२३ रोजी संध्याकाळी ‘श्रावण स्वरधारा’ हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अपेक्षेप्रमाणेच कार्यक्रम अतिशय सुश्राव्य आणि देखणा झाला. दरवर्षी श्रावण महिन्यात हा कार्यक्रम संपन्न होत असला तरी यावर्षीच्या कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे ‘पावसाच्या गाण्यांसोबतच श्रावण महिन्यात येणाऱ्या विविध सणांवर आधारित गाणी म्हणायची किंवा वाद्यावर वाजवायची’ अशी आगळीवेगळी संकल्पना मांडून
दिनांक ०२/०२/२०२० रोजी व्यास संगीत विद्यालयातर्फे ‘विद्यार्थी संगीत संमेलन’ हा कार्यक्रम ‘वनमाळी सभागृह’, दादर येथे आयोजित करण्यात आला. विद्यालयाच्या दादर येथील वास्तूमध्ये विद्यार्थ्यांच्या सांगितीक कलागुणांना वाव देण्यासाठी त्रैमासिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याला नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो. परंतु कार्यक्रम सादरीकरणासाठी हाताशी असणारा कमी वेळ बघता बऱ्याचदा काही विद्यार्थ्यांना कार्यक्रमात सहभागी होता येत नाही, त्याचप्रमाणे या
दिनांक १९/१०/२०१९ रोजी व्यास संगीत विद्यालय, दादर येथे दिवाळीनिमित्त ‘संगीत दीपोत्सव’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. सायंकाळी ५ ते ८ या वेळात ही सांगितीक मैफल येथे सजली होती. दिवाळीनिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा नेहमीच उदंड प्रतिसाद लाभतो, तसा तो यावेळी सुद्धा दिसून आला. आपापल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या तयारीने गाणी सादर केली. या
व्यास संगीत विद्यालय दादर येथे दिनांक २९/९/२०१९ रोजी तबला विषयावर आधारित रियाझाचे तंत्र या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर चर्चासत्र व कार्यशाळा आयोजित करण्यात आली. अजराडा घराण्याचे ज्येष्ठ तबला वादक पं.श्रीधर पाध्ये यांचे शिष्य श्री.मिलन देव यांनी तबला मध्यमा ते विशारद पूर्ण वर्गाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.श्री.मिलन देव हे स्वतः तबला अलंकार ,तबला एम.ए.पदवीधर असून,दिल्ली,अजराडा घराण्याचे अभ्यासक आहेत,तसेच महाराष्ट्र
सालाबादप्रमाणे व्यास संगीत विद्यालय, दादर येथे शनिवार दिनांक १७/०८/२०१९ रोजी सायं. ४.०० वाजता ‘श्रावण स्वर धारा’ हा श्रावण व पाऊस या विषयावर आधारित गाण्यांचा कार्यक्रम यशस्वीपणे सादर करण्यात आला. दरवर्षी या सांगितीक उपक्रमास समस्त विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतो. यावर्षीसुद्धा आपली गायनकला सादर करण्यास इच्छुक अशा साधारणतः ८० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नावे
व्यास संगीत विद्यालय येथे दिनांक २०/०७/२०१९ रोजी खास ‘गुरुपौर्णिमेनिमित्त’ शास्त्रीय संगीत – गायन आणि वादन हा कार्यक्रम संपन्न झाला. कलानिपुण अशा आपल्या अनेक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात आपापल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम तयारीने खूप श्रवणीय गायन आणि वादन सादर केले. माननीय श्री. कुलकर्णीसर आणि मान्यवर शिक्षकांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. गायन विभागात समुह गायन प्रकारात
व्यास संगीत विद्यालय येथे दिनांक १६/०३/२०१९ रोजी शास्त्रीय संगीताचा त्रैमासिक कार्यक्रम संपन्न झाला. कलानिपुण अशा आपल्या अनेक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात आपापल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम तयारीने खूप श्रवणीय गायन आणि वादन सादर केले. माननीय श्री. सुभाष व्यास सर आणि मान्यवर शिक्षकांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. गायन विभागात समुह तथा एकल गायन प्रकारात अनेक रागातल्या
दिनांक ०३/०२/२०१९ रोजी व्यास संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दादर येथील अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात भक्तीगीतांचा अतिशय बहारदार कार्यक्रम सादर केला.विद्यालयातील विद्यार्थीनी श्रीमती शर्मिला आंबवणे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम सादर करायची संधी आपल्या विद्यार्थ्यांना मिळाली. श्री.सुभाष व्यास सर तसेच श्री.कुलकर्णी सर यांनी या कार्यक्रमास मान्यता दिली. श्री. विलास कुंदेकर सर यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली या
व्यास संगीत विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक परिवाराने दिनांक ०३/११/२०१८ शनिवारी सायं.५ ते ९ यावेळेत संगीत दीपोत्सव हा गायनाचा कार्यक्रम सादर करुन संगीतमय दिवाळी साजरी केली. श्री.कुलकर्णी सरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर कार्यक्रमाच्या आरंभीच क्लासमधील विद्यार्थी कै.बबलू इंगळे,कै.अशोक मेस्त्री आणि जेष्ठ श्रेष्ठ संगीतकार,गीतकार,गायक कै.यशवंत देव यांना व्यास संगीत विद्यालयातर्फे श्रध्दांजली देण्यात आली. कै.यशवंत देव यांनी संगीतबद्ध
दिनांक ०८/९/२०१८ शनिवार सायं.४ः३० वाजता श्रावण स्वर धारा हा श्रावण व पाऊस या विषयावर आधारीत गाण्याचा कार्यक्रम व्यास संगीत विद्यालयात यशस्वीपणे सादर करण्यात आला. या कार्यक्रमात साधारणतः ७० विद्यार्थ्यांनी गाणे उत्साहाने सादर केले.सर्वच वयोगटातील या नवोदित कलाकारांचा उत्साह कौतुकास्पद होता.आपल्या भुतकाळातील पावसाचे सुंदर गोड अनुभव आपल्या गीतातून सर्वांनी सादर केले. येरे येरे पावसा रुसलास का
श्री.सुभाष व्यास सर व श्री.कुलकर्णी सर या उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. सौ.स्वराली सावंत व त्यांच्या तयारीच्या विद्यार्थ्यांनी पं.विष्णू दिगंबर पलुस्कर सुरचित *जय जगदीश हरे* ही पारंपरिक प्रार्थना सादर केली. राग भुपाली मधील *मुरली अधर धर शाम* ही बंदिश सादर केली.. वैशाली दावडा मेघा गार्गी कांबळे सानवी वैशाली वराडकर कु.प्रवेश याने तीनतालात
व्यास संगीत विद्यालयात साधारणतः दर तीन महिन्याने (त्रैमासिक) संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा गायन वादनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. दिनांक १० मार्च २०१८ शनिवार यादिवशीही व्यास संगीत विद्यालयात त्रैमासिक गायन वादन अशा संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मान्यवर श्री.व्यास सर,श्री.कुलकर्णी सर,श्री.विलास कुंदेकर सर व सौ.स्वराली सावंत यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला.सौ.शलाकाजी सौ.सुगंधा बोरगावकर व
व्यास संगीत विद्यालय” विद्यार्थी परिवाराचा *संगीत दीपोत्सव* हा संगीतमय कार्यक्रम आज दिनांक १४/१०/२०१७ रोजी नियोजनबद्ध, यशस्वीरित्या साजरा झाला.. पूर्व नियोजना प्रमाणे व ८६ गायक विद्यार्थी संख्या असल्याने कार्यक्रम सायं ४ः१८ मिनीटाने सुरु झाला. ठरल्याप्रमाणे श्री.व्यास सर व श्री.कुलकर्णी सर यांच्या परवानगीने त्यांच्याच अनुपस्थित कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलनाने केली. दीपप्रज्ज्वलनासाठी श्री.कुलकर्णी सरांच्या वतीने त्यांची विद्यार्थीनी कु.दर्शना गडमुळे,श्री.