Menu

व्यास संगीत विद्यालयात दिनांक ११-८-२०१८ रोजी शनिवारी सायंकाळी ५ ते ९ यावेळेत शास्त्रीय संगीताचा त्रैमासिक कार्यक्रम संपन्न झाला.

श्री.सुभाष व्यास सर व श्री.कुलकर्णी सर या उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.


सौ.स्वराली सावंत व त्यांच्या तयारीच्या विद्यार्थ्यांनी पं.विष्णू दिगंबर पलुस्कर सुरचित *जय जगदीश हरे* ही पारंपरिक प्रार्थना सादर केली.


राग भुपाली मधील *मुरली अधर धर शाम* ही बंदिश सादर केली..

वैशाली दावडा

मेघा

गार्गी कांबळे

सानवी

वैशाली वराडकर

कु.प्रवेश याने तीनतालात स्वतंत्र तबला वादन सादर करुन आपली वादन तयारी दाखविली.


राग केदार संवादिनी वादन सादर केले श्रेया यादव आणि तेजश्री ठिक यांनी.


प्रसाद गावंड यानी ताल तीनताल सादर करुन स्वतंत्र तबला वादनातील आपले स्थान सिद्ध केले.


मिश्र रागांवर आधारीत सुमधूर धून…..

योगिता

आशिष

स्विटी

तेजल

श्रेया

नुपूर

अभिषेक

भक्ती

सायली

अभिजीत

या विद्यार्थ्यांनी या वाद्यावर अप्रतिम सादर केली.


स्वतंत्र संवादीनी वादनात राग सारंग सादर केला दिप्ती कोकाटे यांनी


स्वतंत्र तबला वादन ताल तीनताल सादर केला मयुरेश यांनी.


त्यानंतर कु.शिवम यांनीही तीनतालात स्वतंत्र वादन करुन आपले कौशल्य दाखविले .


सौ. वसुंधरा बोपर्डीकर यांनी उत्कृष्ट सितारवादन करुन राग बागेश्री सादर करुन सर्वांनाच तल्लीन केले.


देस रागातील *सुंदर मतवाला* या बंदिशीचे स्वर-तालात सादरीकरण केले

तन्वी चाळके

रुपाली जांब्रे

प्रतिमा जोशी,

चैताली जमिनदार

त्यानंतर स्वप्नील याचे तीनतालातील स्वतंत्र तबला वादन अगदी बहारदार झाले.


कार्यक्रम सुरु असतानाच माननिय पं.विद्याधर व्यासजी व सौ.सुगंधा बोरगांवकर यांचे आगमन झाले…पंडीतजींच्या आगमनाचे औचित्य साधून अ.भा.गां.महाविद्यालयाच्या एप्रिल/मे या सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पंडीतजींच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.


सौ.बोरगांवकर मॕडमनी विद्यालयाच्या नविन वेबसाइट व फेसबुक संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


सचिन गावडे या प्रवे.पूर्ण या विद्यार्थ्यांने तीनतालात वादन करुन आपल्या यशाचा ठसा उमटवला.


संवादिनी स्वतंत्र वादनात राग मालकंस कु.पुजा नागवेकर हिने लीलया सादर केला.


भैरव रागातील बंदिशीचे सितार या वाद्यावर सादरीकरण केले दर्शना गडमुळे हिने तीचे वादन अत्यंत कौतुकास्पद होते.


तीनताल स्वतंत्र तबला सादर केले श्रेयस मोंडकर याने,उत्तम पढंत करुन रचनेचे चलन रसिकांना समजवून तेवढेच सशक्त वादन केले.

व्हायोलिन शिकणाऱ्या

गौरी पाटील

गार्गी देशपांडे

गविन वाघ

अश्लेषा करंबेलकर

या विद्यार्थ्यांनी विलंबित लयीत राग भैरव सादर केला. लयीवरील प्रभुत्व व वादनाचे सौंदर्य त्यांच्या सादरीकरणात प्रकर्षाने दिसत होते.


आदित्य व हर्ष यांचेही त्रितालातील वादन कौतुकास्पद झाले.


तबला वादनात कु.ओजस्वी देवरुखकर हिनेही विविध रचना सादर करुन विविध लयीचे पैलू रसिकांना उघड करुन दाखविले.


पाली राग अमिता सावला यांनी सितारवर सादर करुन रसिकांची दाद मिळवली.


व्हायोलिन वाद्यावर

शशांक सावंत

तेजश्री सरदाल

सतिश म्हात्रे

प्रणव दानवले

अभिजीत शेवाळे

यांनी राग बागेश्री विलंबित लयीत सादर केला,त्यांच्या समूह वादनातही विलंबित लय स्थिर व अढळ होती.लयीवरील प्रभुत्व व एकाग्रता याचा उत्तम आदर्श त्यांनी सर्वांसमोर ठेवला.


विशारद पूर्ण विद्यार्थी श्री.सुनिल भोसले यांनी स्वतंत्र तबला वादनात *मत्तताल (९ मात्रा)* याअप्रचलित तालाची निवड केली.पेशकार ते चक्रदार अशी संकल्पना आपल्या वादनात सादर केली.


राग बिहाग सादर केला गायनाच्या

सोनाली हडकर

तृप्ती अग्रवाल

तन्वी मंत्री

दिपाली शिंदे

जान्हवी आंजर्लेकर

अश्मदा पडवळ

निकीता चितकोपर

रुपाली मोरे

या विद्यार्थीनींनी.स्वरांवरील प्रभुत्व व रागाची उत्तम जाण त्यांच्या गायनात दिसत होती.


कार्यक्रमाचे अंतिम पुष्प भैरवी, म्हणजेच पं.विष्णू दि.पलुस्कर सुरचित *रचा प्रभो तुने यह* ही प्रार्थना गायनाच्या विद्यार्थ्यांनी भक्तीभावे सादर करुन कार्यक्रमाची सांगता केली


वरील कार्यक्रम यशस्वी करण्यास.

श्री.अशोक मेस्त्री

ओमकार खरे

सचिन

सुबोध

सुनिल

प्रसाद

गवस

श्रेयस

गमरे

सुरज

दर्शना

निकीता

शर्मिला

विक्रांत

किरण

या सहकार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विद्यालयातर्फे आभार मानण्यात आले.


फोटोग्राफर श्री.कमलेशजी दादरकर यांनी वेळेत उपस्थित राहून छायाचित्रण केले.त्याचेही आभार


कार्यक्रमाचे नियमबद्ध सुत्रसंचालन व निवेदन कु.दर्शना गडमुळे व किरण पांचाळ यांनी केले.


ध्वनीक्षेपण तज्ञ सुनिल भोसले यांची कामगिरी कौतुकास्पद होती.


माननिय पं.व्यास सर सर्व विश्वस्त

श्री.सुभाष व्यास सर

श्री.कुलकर्णी सर

सौ.बोरगांवकर मॅडम

सौ.शलाका मॅडम

सौ.स्वराली मॅडम

श्री.शानबाग सर

श्री.काळसेकर सर

श्री.कुंदेकर सर

श्री.खान सर

सर्वांचे योगदान अनमोल होते

Dear Students,

          Please be informed that on-premise classes at The Vyas Academy Of Indian Music are held every evening from Monday to Saturday. Classes for Vocal, Sitar, Tabla, Harmonium, Violin, Guitar and Keyboard are conducted.

For further information, kindly contact :

Shri Prabhakar Kulkarni on 9930741488.(10:00 am to 9:00 pm)

Vyas Sangeet Vidyalaya on 9136092358.(10.00 am to 8.00 pm)

Okay