Menu

रियाझाचे तंत्र या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर चर्चासत्र व कार्यशाळा दिनांक २९/९/२०१९ रोजी आयोजित करण्यात आली.

व्यास संगीत विद्यालय दादर येथे दिनांक २९/९/२०१९ रोजी तबला विषयावर आधारित रियाझाचे तंत्र या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर चर्चासत्र व कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

अजराडा घराण्याचे ज्येष्ठ तबला वादक पं.श्रीधर पाध्ये यांचे शिष्य श्री.मिलन देव यांनी तबला मध्यमा ते विशारद पूर्ण वर्गाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.श्री.मिलन देव हे स्वतः तबला अलंकार ,तबला एम.ए.पदवीधर असून,दिल्ली,अजराडा घराण्याचे अभ्यासक आहेत,तसेच महाराष्ट्र संगीत शिक्षण संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत.

चर्चासत्रात त्यांनी बोटांमध्ये वजन कसे निर्माण करता येईल याबाबतचे मार्गदर्शन करुन “धाधा तिट धाधा तींना” या कायद्याचा आधार घेऊन विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करुन घेतले.

‘तिरकिट’ ‘धिरीतिरी’ या बोलांचा निकास तसेच मात्रांवरील नियंत्रण कसे मिळवता येते याबद्दल प्रत्यक्ष वादनातून दाखविले.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना Motivation आणि Inspiration यातला फरक समजावून दिला तसेच रचना व बंदिश या समान भासणाऱ्या शब्दांमधील भेद उलगडून दाखविला.तबला केवळ बोटांनी नव्हे तर बुद्धीने म्हणजेच चिंतनाने सतत सुरु असला पाहिजे,त्यामुळे दिवसाच्या धावपळीतही रियाझ कुठेही व कसाही केला जाऊ शकतो.रियाझ करताना नेहमीच लहरा साथीला घ्यावा हे त्यांनी आवर्जून सांगितले.

आपल्या वादनातून प्रथम स्वतःला आनंद मिळाला पाहिजे तरच तो इतरांना देता येईल.

श्री.देव सर यांनी अवघ्या चार तासात मुळाक्षरांपासून रचनांपर्यतची तयारी करण्याची गुरुकिल्लीच विद्यार्थ्यांच्या हाती दिली.

श्री.सुभाष व्यास सर यांनी व्यास संगीत विद्यालयातर्फे श्री.देव सर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.श्री.कुलकर्णी सरांची उपस्थिती नियोजनासाठी अत्यंत मोलाची होती.

व्यास संगीत विद्यालय तसेच बाहेरील अन्य संस्थेतील विद्यार्थ्यांनी चर्चासत्रेत सहभाग घेतला.जागे अभावी एकूण १५-२० विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात आला.या कार्यशाळेची विद्यार्थ्यांकडून पुन्हा मागणी होत आहे हेच यशाचे प्रमाणपत्र म्हणावे लागेल.

Dear Students,

          Please be informed that on-premise classes at The Vyas Academy Of Indian Music are held every evening from Monday to Saturday. Classes for Vocal, Sitar, Tabla, Harmonium, Violin, Guitar and Keyboard are conducted.

For further information, kindly contact :

Shri Prabhakar Kulkarni on 9930741488.(10:00 am to 9:00 pm)

Vyas Sangeet Vidyalaya on 9136092358.(10.00 am to 8.00 pm)

Okay