व्यास संगीत विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक परिवाराने दिनांक ०३/११/२०१८ शनिवारी सायं.५ ते ९ यावेळेत संगीत दीपोत्सव हा गायनाचा कार्यक्रम सादर करुन संगीतमय दिवाळी साजरी केली. श्री.कुलकर्णी सरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर कार्यक्रमाच्या आरंभीच क्लासमधील विद्यार्थी कै.बबलू इंगळे,कै.अशोक मेस्त्री आणि जेष्ठ श्रेष्ठ संगीतकार,गीतकार,गायक कै.यशवंत देव यांना व्यास संगीत विद्यालयातर्फे श्रध्दांजली देण्यात आली.
कै.यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेल्या, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तदनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या पसंतीची गाणी पूर्ण तयारीने सादर केली.विद्यार्थ्यांनीच विद्यार्थ्यांना वाद्यांची साथ केली. भक्तीगीते, भावगीते, नाट्यगीते, मराठी व हिंदी सिनेमागीते अशी दर्जेदार गाणीसादर करताना विद्यार्थ्यांचा उत्साह कौतुकास्पद होता.
अगदी लहान मुलां पासून ते जेष्ठ मंडळींपर्यंत सर्वांनीच गाण्याचा आस्वाद घेतला. लक्षदिप हे, विठ्ठल आवडी, भाग्यदालक्ष्मी, त्या फुलांच्या गंधकोषी,धुंदी कळ्यांना,ऋतुराज,केव्हातरी पहाटे, तुला पाहीले मी नदीच्या किनारी…तसेच श्री रामचंद्र कृपालू, सुख के सब साथी,जब दिप जले आना,यारा हो यारा,गली मे आज चाँद,..अशी विविध विषयांची निवड दर्जेदार होती. कित्येक गाण्यांना वन्स मोअरचा मान प्राप्त झाला.
या कार्यक्रमास पं.विद्याधर व्यास सर, श्री.सुभाष व्यास सर, सौ.बोरगावकर मॅडम यांचे सहकार्य होतेच त्याचप्रमाणे श्री.कुलकर्णी सर, सौ.स्वराली सावंत मॅडम यांनी प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवली. श्री.विलास सर यांनी विद्यार्थ्यांची उत्तम तयारी करुन घेतली होती.
सौ.शलाका मॅडमनी आपल्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी प्रेरीत केले. श्री.काळसेकर सर, श्री.शानबाग सर, खान सर यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कार्यक्रमात सहभाग होता. सौ.स्वराली मॅडमनी आजी सोनियाचा दिनु गाणे सादर केले.
श्री.किरण पांचाळ यांनी आपल्या पहाडी आवाजात नामवंत गायक श्री. प्रल्हाद शिंदे यांचे गेला दसरा आली दिवाळी हे पारंपरिक गाणे सादर करुन, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर या भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली…..
विद्यालयातील विद्यार्थी श्री.गवाणकर यांनी सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था अगदीच अल्प दरात केली. तसेच अश्विनी मॅडम(सितार विद्यार्थी) यांनीही मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे निवेदन
श्री.किरण पांचाळ
तन्वी मंत्री
पुष्पा आणि दर्शना गडमुळे यांनी केले.
सिंथेसाइझर
कु.ऋत्विक तांबे
हार्मोनिअम
श्री.रुपेश धोपटे
तबला
कु.श्रीधर
श्री.सुनिल
निहार
सुबोध
किरण
साइड रिदम
सचिन
विक्रांत
सजावट
शर्मिला आंबवणे
निकिता तांबे
साउंड
सुनिल भोसले
प्रसाद गावंड