Menu

“व्यास संगीत विद्यालय” विद्यार्थी परिवाराचा *संगीत दीपोत्सव*

व्यास संगीत विद्यालय” विद्यार्थी परिवाराचा *संगीत दीपोत्सव* हा संगीतमय कार्यक्रम आज दिनांक १४/१०/२०१७ रोजी नियोजनबद्ध, यशस्वीरित्या साजरा झाला..

पूर्व नियोजना प्रमाणे व ८६ गायक विद्यार्थी संख्या असल्याने कार्यक्रम सायं ४ः१८ मिनीटाने सुरु झाला.

ठरल्याप्रमाणे श्री.व्यास सर व श्री.कुलकर्णी सर यांच्या परवानगीने त्यांच्याच अनुपस्थित कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलनाने केली.

दीपप्रज्ज्वलनासाठी श्री.कुलकर्णी सरांच्या वतीने त्यांची विद्यार्थीनी कु.दर्शना गडमुळे,श्री. विलास सरांच्या वतीने त्याची विद्यार्थीनी कु.शर्मिला आंबवणे,श्री.काळसेकर सरांच्या वतीने त्यांचे विद्यार्थी श्री.उदय पांचाळ तसेच सौ.स्वराली मॕडम् यांनी स्वतः दीपप्रज्ज्वलन केले.प्रथमच आगळ्यावेगळ्या पद्धतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

श्रेया यादव या बालकलाकार मुलीने तू बुद्धी दे तू तेज दे..या गाण्याने कार्यक्रमास आरंभ केला..तद्नंतर विविध गाणी भक्तीगीते,भावगीते,हिंदी सिनेगीते या आधारावर विद्यार्थ्यांनी सादर केली.सौ.मिनल सावंत यांच्या *एक राधा एक मीरा*या गाण्याला रसिकांनी प्रचंड दाद देऊन (once_more) मागणी केली.कार्यक्रमाचा रंग उत्तरोत्तर रंगू लागला.

मधल्या काही वेळेत पं.विद्याधर व्यास सर यांनी ४व५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या *व्यास संगीत विद्यालयाचे सफल ऐंशीवर्षेपूर्ती*निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाची थोडक्यात रुपरेषा मांडली.

पुढे श्री.लक्ष्मण दळवी यांच्या अणु रणिया थोकडा या संत तुकारामांच्या अभंगाने कार्यक्रमाचा उत्तरांग सुरु झाला.

कार्यक्रमाच्या शेवटी श्री.किरण पांचाळ व सचिन गावडे यांनी “गेला दसरा आली दिवाळी”हे गीत सादर करुन कार्यक्रमाचा शेवट जल्लोषात व शुभच्छा रुपाने केला..

या कार्यक्रमास यशस्वीरित्या सादर करण्यासाठी पं.श्री.विद्याधर व्यास सर,श्री.सुभाष व्यास सर,श्री.कुलकर्णी सर,सौ.स्वराली सावंत मॕडम् यांचा हातभार होताच परंतू दुपारी २:३०वाजल्यापासून सजावट करण्यासाठी कु.शर्मिला,कु.दर्शना,कु.निकीता,कु.ढोलम,सौ.प्रतिक्षा नागवेकर,श्री.गवस,श्री.रेवाळे,श्री.सचिन,श्री.किरण,श्री.प्रसाद,श्री.सुनिल,श्री.रुपेश,कु.क्षितीज,कु.श्रेयस यांचा मोलाचा वाटा होता.

Rupesh Sound service(Tabla student Rupesh Dhopte)

Sound operator Sunil Bhosale(Tabla Visharad)

Handsonic side rhydum elc.Instrument operator Mr.Nandkumar Redij(Tabla Visharad)

तबला संगत

बबलू इंगळे

श्रीधर भंडगे

क्षितिज पाटील

सचिन गावडे

उदय पांचाळ

किरण पांचाळ

सुनिल भोसले

श्रेयस मोंडकर

सुबोध देवळेकर

अमेय गाढवे

अशोक मेस्त्री

हार्मोनिअम साथ . सौ.स्वराली सावंत

श्री.संदीप वालावलकर.

कार्यक्रमाचे निवेदन व सुचना

अगदी मोजक्या शब्दात कु.दर्शना गडमुळे हीने केले. व कार्यक्रम वेळेत सादर केला.

दीपोत्सवाचा फराळ म्हणून सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी श्री.कुलकर्णी सरांनी दीवाळी शुभेच्छा देऊन समाप्ती जाहीर केली

शब्दांकनःअरुण कुंदेकर..

Thanks and Regards

Prabhakar Kulkarni

Dear Students,

          Please be informed that on-premise classes at The Vyas Academy Of Indian Music are held every evening from Monday to Saturday. Classes for Vocal, Sitar, Tabla, Harmonium, Violin, Guitar and Keyboard are conducted.

For further information, kindly contact :

Shri Prabhakar Kulkarni on 9930741488.(10:00 am to 9:00 pm)

Vyas Sangeet Vidyalaya on 9136092358.(10.00 am to 8.00 pm)

Okay