Menu

सुनिल भोसले

२९/०९/२०१९ रोजी व्यास संगीत विद्यालय येथे आयोजित केलेल्या तबला वर्कशॉपमध्ये श्री मिलन देव सर यांच्या मार्गदर्शनाखाली तबला रियाज या प्रकारात ( comfort आणि pain)
या मधील फरक समजावून पेन आणि मेहनत याला ( shortcut) नाही हे उत्कृष्टरित्या समजावून सांगितले.
बौध्दिक रियाज २४ तास झालाच पाहिजे यामध्ये सातत्य कसे आणता येईल हे सुद्धा छान प्रकारे समजावले.
मन आणि बुद्धी यांचा सूक्ष्म विचार तबल्यामध्ये केला जातो व तो बेसिक लेवलपासूनच कसा करता येईल व कसा करावा हे देखील उत्कृष्टरित्या समजाविले.
प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखे असते आणि ते डोळसपणे कसे शिकतायेईल हे देखील समजावून सांगितले.
या व अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले तबल्यामधील बोलांचा रियाजही करून घेतला.
यासाठी आपल्या संस्थेतील विद्यार्थी होतेच पण आपल्या संस्थेबाहेरील विद्यार्थ्यांनीही याचा लाभ घेतला.
अवघ्या ४ तासाचे वर्कशॉप खूप छान झाले आणि असेच वर्कशॉप वारंवार झाले पाहिजेत असे मनापासून वाटते जेणेकरून भरपूर विद्यार्थांना याचा लाभ घेता येईल.
श्री अरुण कुंदेकर सरांचे खूप आभार त्यांच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली.
श्री सुभाष व्यास सर आणि श्री कुलकर्णी सर यांचीही उपस्थिती मोलाची लाभली.

Dear Students,

          Please be informed that on-premise classes at The Vyas Academy Of Indian Music are held every evening from Monday to Saturday. Classes for Vocal, Sitar, Tabla, Harmonium, Violin, Guitar and Keyboard are conducted.

For further information, kindly contact :

Shri Prabhakar Kulkarni on 9930741488.(10:00 am to 9:00 pm)

Vyas Sangeet Vidyalaya on 9136092358.(10.00 am to 8.00 pm)

Okay