किरण पांचाळ
९/९/२०१९ रोजी श्री. मिलन देव सरांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. तबला विध्यार्थ्यांने रियाझ कसा करावा या विषयावर जास्त भर होता. बोटांमध्ये वजन कस आणता येईल, त्या साठी बोल वाजवण्याची पद्धत, हाताची ठेवणं या सर्वात महत्वाच्या गोष्टीवर चर्चा केली व प्रत्यक्ष हे बोल आमच्याकडून वाजवून घेतले. “तीट “, “तिरकीट ” आणि ” धीर तिर ” या बोलांचा निकास तसेच या मात्रा वाजवताना लागणारे नियंत्रण, या गोष्टी समजावून सांगितल्या. एक तबला विध्यार्थी म्हणून, माझ्या साठी आजचे देव सरांचे व्याख्यान खूप महत्वाचे होते. आमच्या साठी या व्याख्यानाचे आयोजन केल्या बद्दल, माझे गुरु श्री. अरुणजी कुंदेकर यांचे शतशः आभार.
एक विनंती करतो कि, विद्यालयात अशी अनेक व्याख्याने पुन्हा पुन्हा व्हावीत.