मी अरविंद इंगळे(बबलू),माझे तबल्याचे शिक्षण विक्रोळी येथील मटकर संगीत विद्यालयात झाले.श्री.मोहन गुरव हे माझे तबल्याचे प्रथम गुरु,१९९८ पासून यांच्या मार्गदर्शनाखाली माझे तबला शिक्षण सुरु झाले.प्रारंभिक ते मध्यमा प्रथम अशा सुरुवातीच्या परीक्षा श्री.गुरव सरांच्या मार्गदर्शनाखाली उत्तीर्ण झालो.काही काळानंतर आर्थिक अडचणीमुळे मटकर संगीत विद्यालयात शिक्षण घेण्यास अडचणी येऊ लागल्या व शिक्षणात खंड पडू लागला.याच काळात म्हणजे २००६ या वर्षी माझा जिवलग मित्र कु.रविकिरण खरटमल याने मला दादर येथिल “व्यास संगीत विद्यालयाबद्दल सांगितले ,थोडाही वेळ न घालवता आम्ही दोघांनी व्यास संगीत विद्यालयात १/७/२००६ रोजी प्रवेश घेतला,तिथे श्री.अरुण कुंदेकर यांचे मार्गदर्शन लाभले.त्यानंतर पुढील तबला शिक्षण सुरळीत व आनंदात सुरु झाले. व्यास संगीत विद्यालय जेवढे जुने तेवढेच अनुभवी आहे.तिथली शिक्षण पद्धती व संगीतास पोषक वातावरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक मनोवृत्तीचे शिक्षक हे या विद्यालयाचे वैशिष्ट्य आहे.या विद्यालयात येऊन माझी तबल्याची आवड व्दिगुणीत झाली,पुढे २०१० साली विशारद प्रथम परीक्षा उत्तीर्ण झालो.
पुर्वी शिक्षणात ज्या प्राथमिक गोष्टी शिकायच्या राहिल्या त्या व्यास संगीत विद्यालयात श्री.अरुण कुंदेकर सरांकडून सहज मिळू लागल्या .क्रियात्मक तबल्यासोबतच तबल्याचे शास्त्र सुद्धा इथे शिकवले जात होते.नविन रचना शिकत शिकत २०१३ साली मी तबला विशारद पूर्ण परीक्षा उत्तीर्ण झालो.माझ्या या यशात व्यास संगीत विद्यालय व श्री.अरुण कुंदेकर सर यांचे मोठे योगदान आहे
Dear Students,
Please be informed that on-premise classes at The Vyas Academy Of Indian Music are held every evening from Monday to Saturday. Classes for Vocal, Sitar, Tabla, Harmonium, Violin, Guitar and Keyboard are conducted.
For further information, kindly contact :
Shri Prabhakar Kulkarni on 9930741488.(10:00 am to 9:00 pm)
Vyas Sangeet Vidyalaya on 9136092358.(10.00 am to 8.00 pm)