मी कु. क्षितीज हिराचंद रचना पाटिल,मला लहानपणापासूनच दिसेल त्या वस्तूवर ताल धरण्याची आवड होती.माझी आवड पाहून माझ्या आई बाबांनी १९९८ साली “बालमोहन विद्या मंदिर” दादर येथिल श्री.शिंदे सर यांच्याकडे मला तबला शिकण्यास पाठविले.
सर्वच बाजूने सोयीचे म्हणून व व्यास संगीत विद्द्यालयाचे नाव लौकिक पाहून जून १९९९ साली बाबांनी मला व्यास संगीत विद्यालयात तबला शिकण्यासाठी प्रवेश घेऊन दिला,तिथे शिंदे सरच तबला शिकवत होते. व्यास संगीत विद्यालयातील संगीतमय वातावरणाने मी सहा वर्षाचा असतानाही तिथे सहज रमलो व आनंदाने आवडीने तबला शिकू लागलो.पुढे २००० साली श्री.शिंदे सरांनी तब्येत ठिक नसल्याने विद्यालयातील शिकवणे बंद केले व तिथे श्री.अरुण कुंदेकर सरांची नेमणूक झाली.त्यानंतर वर्ष २००० ते २०१५ पर्यंत माझे शिक्षण अखंडीत सुरु राहीले. व्यास संगीत विद्यालयात नियमित होणारे कार्यक्रम त्यामुळे वादनाचा अनुभव सहज मिळत होता.अन्य विद्यार्थ्यांसोबत साथ करण्याची गंमत अनुभवायला मिळते.नोव्हेंबर २०१५ साली मी तबला विशारद पूर्ण ही पदवी प्राप्त केली.या अल्पकाळात एका चर्चासत्रात उ.झाकीर हुसेन यांचेही मार्गदर्शन लाभले.आज मी स्वतःही तबला वादना सोबत तबल्याचे वर्ग चालवत आहे.माझ्या या यशात व्यास संगीत विद्यालयाचा व माझ्या गुरुंचा फार मोलाचा वाटा आहे
Dear Students,
Please be informed that on-premise classes at The Vyas Academy Of Indian Music are held every evening from Monday to Saturday. Classes for Vocal, Sitar, Tabla, Harmonium, Violin, Guitar and Keyboard are conducted.
For further information, kindly contact :
Shri Prabhakar Kulkarni on 9930741488.(10:00 am to 9:00 pm)
Vyas Sangeet Vidyalaya on 9136092358.(10.00 am to 8.00 pm)